आरपीआय आठवले गटाने दापोलीमध्ये उमेदवार जाहीर केला !

.
Ramdas_Athavle.
Ramdas_Athavle.

दाभोळ  :  विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून दापोली विधानसभा मतदार संघातून आरपीआय (आठवले गट) चे उमेदवार म्हणून सिद्धार्थ  कासारे यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे.

संपूर्ण राज्यात आरपीआय (आठवले गट) ची शिवसेना भाजपशी युती असताना फक्त रत्नागिरी जिल्ह्यात आरपीआयने युतीशी फारकत घेतली आहे. 

आज झालेल्या दापोली, खेड व मंडणगड तालुक्याच्या पक्षाच्या दापोली येथे झालेल्या जनरल सभेत जेष्ठ नेते सिद्धार्थ कासारे यांची दापोली विधानसभा मतदार संघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

सिद्धार्थ कासारे  हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत .त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम केलेले आहे . ते  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकणचे कार्याध्यक्ष आहेत .

 दापोलीत पार पडलेल्या पक्षाच्या सभेत सर्वानुमतेत्यांच्या नावाची  घोषणा करण्यात आली. 
या सभेस राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मरचंडे, जिल्हा सरचिटणीस प्रितम रूके. दापोली तालुका अध्यक्ष राहूल जाधव, मंडणगड तालुका अध्यक्ष राजेश गमरे, खेड तालुका अध्यक्ष गिरीश गमरे, दापोली तालुका संघटक अनिल जाधव,

तालुका चिटणीस सुरेश मोरे ,सहचिटणीस दिनेश रूके ,उपाध्यक्ष संजय तांबे, युवक अध्यक्ष वीरेंद्र मोरे, युवक चिटणीस जितेंद्र जाधव, विजय मोरे, शरद धोत्रे, विजय रूके,खेरडी अध्यक्ष चंद्रकात जाधव,दिलीप सजन जाधव, नवनीत जाधव, अमोल जाधव,विजय जाधव, सुधाकर पवार,, राहुल रूके, विधानसभा क्षेत्राधयक्ष सुरेश चाफे,संदिप मोरे,जयेंद्र जाधव इत्यादी पदाधिकारी  यांच्या उपस्थितीत मिटिंग पार पाडली. व ऊमेदवार सिध्दार्थ कासारे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com