राष्ट्रवादीने भगवा फडकवला; पण विरोधकांनी वाद उकरला!

राष्ट्रवादीने भगवा फडकवला; पण विरोधकांनी वाद उकरला!

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात भगवा झेंडा फडकविण्याची घोषणा पक्षाचे नेते अजित पवार यांनी केल्यानंतर हा भगवा झेंडा राष्ट्रवादीच्या तिरंगा झेंड्यासोबत दिसू लागला आहे. मात्र या भगवा झेंड्यावरून विरोधकांनी टीका केली आहे.

शिवस्वराज्य यात्रेत भगवा झेंडा सोबत घेऊन मराठी माणसाशी आपलं नातं अधिक दुढ करण्याचे धोरण या मागे असावे. सत्तेवर आल्यास स्थानिकांना 80 टक्के रोजगार संधी देण्याचे धोरण पक्षाने जाहीर केले आहे. परप्रांतीयांचे मत हे भाजपला जात आहेत. शहरातील मतेही सेना-भाजपची आता मक्तेदारी बनली आहे. मराठा नेत्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची ताकद कमी करण्याचे भाजपचे धोरण आहे.

या साऱ्याला भावनात्मक उत्तर म्हणून राष्ट्रवादीने भगव्या झेंड्याचा निर्णय घेतला असवा. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात भगवा झेंडा फडकवाला जात होता. तसेच शिवाजी महाराजांचा झेंडा, हिंदूंचा झेंडा म्हणूनही भगव्याची ओळख आहे. राष्ट्रवादाचे प्रतिक म्हणूनही हा झेंडा ओळखला जातो. त्यामुळेच या साऱ्या बाबींचा विचार आपणही राष्ट्रवादी दाखविण्यासाठी राष्ट्रवादीने भगवा झेंडा फडकविण्याचा निर्णय घेतला असावा.

दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने राष्ट्रवादीने भगवा झेंडा हाती घेतला याचे स्वागत केले तरी याबाबत जरा उशीर झाला असा टोमणाही अजित पवार यांना लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर अजित पवार यांची पावलं कुठे पडत आहेत असा सूचक इशारा करत सवाल केला आहे. तर भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी मनगटात घड्याळ नाही तर भगवा सांभाळण्याची ताकद लागते असा टोला अजित पवार यांना लगावला आहे. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भगवा झेंडा कुणाची मक्तेदारी नसल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com