राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदी रुपाली चाकणकरांची निवड

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात केली. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यपदावरुन काल चित्रा वाघ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच आज चाकणकर यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदी रुपाली चाकणकरांची निवड

पुणे :राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात केली. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यपदावरुन काल चित्रा वाघ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच आज चाकणकर यांची निवड करण्यात आली. 

भोर, मावळ, शिरूर, हवेली, खेड आळंदी, जुन्नर, इंदापूर इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती पुण्यात निसर्ग मंगल कार्यालयात सुरु आहेत. त्या दरम्यान जयंत पाटील यांनी ही घोषणा केली.  चित्रा वाघ या राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या काल दिवसभर वृतवाहिन्यांवर झळकत होत्या. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीने हे पक्षांतर होत असल्यासंबंधीचे फोटोही व्हायरल झाले, मात्र वाघ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र रात्री उशिरा त्यांनी पक्ष आणि पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com