rohiy pawar demands changes in ncp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

राष्ट्रवादीत भाकरी नाही तर पीठच बदलण्याची गरज : रोहित पवार

संपत मोरे
सोमवार, 10 जून 2019

राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी पक्षातील भाकरीच नाही तर पीठ पण बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. पक्षातील `पीठ` म्हणजे नक्की काय, हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी त्यांचा डोळा काही ज्येष्ठ नेत्यांवर तर नाही ना, अशी शंका यामुळे व्यक्त होऊ लागली आहे. 

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचा २० वा वर्धापन दिन म्हणजे तरुणांच्या वयाप्रमाणे २० वर्ष समजून तरुणांना अधिकाधिक संघी देत पक्षसंघटना वाढवण्यास भर देण्यात यावा,``अशी अपेक्षा पक्षाचे युवानेते रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

रोहित यांनी पक्षाविषयीची मते सोशल मिडियात मांडली आहेत. आज पक्षाचा २० वा वर्धापन दिन. १९ वर्षाच्या या प्रवासात आपण १५ वर्ष सत्तेत होतो. या १५ वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य हे सर्वांगिण विकासात देशात नंबर एकचे राज्य म्हणून गणले जायचे. पण सातत्याने सत्ता असण्याचे जसे फायदे असतात तसे काही दोष देखील असतात, असे त्यांनी म्हटले आहे.

``अनेकांच्या मते, सत्ता असताना झालेली कामे लोकांपर्यन्त पोहचवण्यास आपण कुठेतरी कमी पडलो. सातत्याने सत्तेत राहिल्यामुळे त्याच त्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, त्यातून नवीन लोकांना संधी मिळाली नाही आणि जून्या लोकांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद ठेवण्यास महत्व दिलं नाही. त्यातूनच लोकांपर्यंत पक्षाची कामे पोहचवण्यास आपण कमी पडत गेलो. त्याच त्या लोकांना पक्षामार्फत संधी देण्यात आल्याची नाराजी पक्षात देखील वाढू लागली. या सर्वांचा एकत्रित परिणाम पक्ष संघटनेवर झाला. हे पाहूनच साहेब भाकरी फिरवण्याबाबत बोलले असावेत, काहीअंशी तर भाकरी फिरवण्यासोबत पीठ देखील बदलावे लागणार असल्याचं जाणवतं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख