रोहित पवार हे निवडणूक लढविणार आहेत... : शरद पवार

रोहित पवार हे निवडणूक लढविणार आहेत... : शरद पवार

पुणे : जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या संदर्भातील निर्णय झाला आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यासंदर्भात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली.

रोहित यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. मात्र, त्याचा संबंध इतर कशाशीही जोडू नका, असेही पवार यांनी स्पष्ट केले. कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी रोहित गेल्या वर्षभरापासून करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आजच्या पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे रोहित यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या वेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याविषयी भूमिका मांडली. अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही. राजकारणाची पातळी खालावली आहे. आपल्या काकांसारख्या (शरद पवार) माणसाला सुद्धा नोटीस येतात. या अस्वस्थेतून त्यांनी राजीनामा दिला, अशी माहिती त्यांनी आपल्या कुटंबाला दिल्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राजकारण कोणत्याही थराला गेलेले आहे. त्यात राहण्यापेक्षा आपली शेती केलेली बरी, अशी भूमिका त्यांनी आपल्या चिरंजिवाकडे मांडली.  अजित पवार यांनी आपल्या मुलांनाही राजकारणात येऊ नये, असा सल्ला दिल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

राज्य सहकारी बॅंकेच्या प्रकरणात माझे (शरद पवार) नाव गोवण्यात आल्याने ते अस्वस्थ होते. आपल्यामुळे आपल्या काकांना त्रास झाल्याची भावना त्यांनी कुटुंबियांना बोलून दाखवली. ते या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडतील, असा मला विश्वास आहे. मात्र त्यांचा नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असावा, असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केली. पवार कुटुंबियांत यत्किंचितही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com