#COVID2019 विषयी जनजागृतीसाठी बॉलिवूडकर एकवटले; रोहित शेट्टीने तयार केला खास व्हिडिओ

कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण बॉलिवूड आता एकवटले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने जनजागृतीसाठी एक व्हिडिओ तयार केला आहे
Rohit Shetty Released Video To Fight Agianst Corona
Rohit Shetty Released Video To Fight Agianst Corona

मुंबई : कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण बॉलिवूड आता एकवटले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, वरुण धवन यांसारखे टॉपचे कलाकार नागरिकांना आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या असे आवाहन करताना दिसत आहेत. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करु नयेत हे देखील या कलाकार मंडळींनी या व्हिडिओ मार्फत सांगितले आहे.

देशाच्या प्रत्येक नागरिकारने आपली काळजी घ्यावी आणि सरकारच्या नियमांचे पालन करावे म्हणून रोहित शेट्टीने हा व्हिडिओ तयार केला आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले रोहित शेट्टीचे आभार

दिग्दर्शक रोहित शेट्टीने कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून बॉलिवूडमधील कलाकारांना घेऊन एक व्हिडिओ तयार केला. हा सकारात्मक व्हिडिओ पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत. ''चार ते पाच दिवसांपूर्वी मला रोहित शेट्टी भेटले. मी तुम्हाला मदत करण्यास इच्छुक आहे असे सांगून त्यांनी हा व्हिडिओ तयार करुन राज्य सरकारकडे दिला आहे. तो आम्ही सीएमओमधून प्रदर्शित केला आहे.'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com