नातू आला रे नातू आला - शरद पवारांचा नातू आला , असा गलबला झाला - Rohit Pawar welcomed in a unique style | Politics Marathi News - Sarkarnama

नातू आला रे नातू आला - शरद पवारांचा नातू आला , असा गलबला झाला

सरकारनामा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

.

कर्जत :  येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते रोहित पवार यांच्या विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान,मुंबई आणि स्टार की हिअरिंग फौंडेशन यांचे मार्फत शनिवारी आयोजित मोफत श्रवण यंत्र वाटप शिबीर घेण्यात आले .  रोहित पवार यांचे कार्यक्रमाचे ठिकाणी आगमन झाल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करीत त्यांचे उस्फुर्त स्वागत केले. 'नातू आला रे नातू आला, शरद पवारांचा नातू आला' असा एकच गलबला झाला. या अनोख्या स्वागताने रोहित पवार काही काळ भावनिक झाले.

आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले, "   शारीरिक व्यंग हे शक्तिस्थाने आहेत त्याचा न्यूनगंड मनामध्ये कधीही बाळगू नका.निर्मात्याने एखादी गोष्ट कमी दिली असली तरी एखादा गुण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दिलेला  असतो.दिसणे,बोलणे आणि ऐकणे या तिन्ही क्रिया अत्यंत आवश्यक असून त्या साठी या शिबिराच्या माध्यमातून काही करू शकलो याचे आत्मिक समाधान आहे.पवार साहेब आणि परिवाराची नाळ  सर्वसामान्यांशी जुळली आहे,त्यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानीत त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले.त्यांनी दाखवून दिलेल्या आदर्श वाटेवर वाटचाल सुरुआहे. त्या मुळेच सामाजिक कार्याला प्राधान्य आहे."

या वेळी सुभाष गुळवे, काका तापकीर,नितीन धांडे,दीपक शिंदे,दादासाहेब थोरात, रघुनाथ काळदाते,अशोकराव जायभाय,कुशाभाऊ नेटके,शाहूराजे भोसले,किरण पावणे,वसंत कांबळे,माउली सायकर,स्टार की हिअरिंग फौंडेशन चे समन्वयक सागर काणेकर,रवी गुप्ता,टी व्ही सरथ,सुरजित पेन,स्टेजीन बेणी आदी उपस्थित होते.  

आज आणि उद्या असे दोन दिवस हे शिबीर चालणार आहे . या मोफत श्रवण यंत्र वाटप (पूर्व नाव नोंदणी व तपासणी ) शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी तीनशे एक्कावन्न रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असल्याची माहिती समन्वयक सागर काणेकर यांनी दिली आहे.या वेळी उपस्थितांचे आभाररघुनाथ काळदाते यांनी मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख