रोहित पवार राम शिंदेंच्या घरी गेले...शिंदेंनीही फेटा बांधून सत्कार केला

रोहित पवार राम शिंदेंच्या घरी गेले...शिंदेंनीही फेटा बांधून सत्कार केला

नगर : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विजयी उमेदवार रोहित पवार यांनी विरोधक असलेल्या व पराभूत झालेल्या भाजपच्या राम शिंदे यांच्या आईचे आशिर्वाद घेतले. राम शिंदे यांनी पवार यांचा फेटा बांधून सत्कार केला.

राज्याचे लक्ष लागलेल्या या लढतीत मोठा संघर्ष होऊनही पवार यांनी विजयी होताच चोंडी येथे येऊन अहल्यादेवी  होळकर यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर लगेचच विरोधक असलेल्या राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. शिंदे यांच्या आईचे दर्शन घेऊन पुढील कामासाठी आशिर्वाद घेतले. या वेळी राम शिंदे यांनीही रोहित पवार यांचे अभिनंदन करीत त्यांना श्रीफळ देऊन फेटा बांधला. या अनोख्या सत्काराने कार्यकर्तेही आवाक झाले.

यावेळी रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार, भगिनी सई पवार आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 पवार आणि शिंदे यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू होते.शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टिका बारामतीचे पार्सल परत पाठवा असे लोकांना आवाहन केले होते.'सावज आल आहे त्यांची शिकार करणार' असेही विधान त्यांनी केले होते.

रोहित पवार यांनी 'राम शिंदे यांनी विकासकामे न करता गावोगावी फक्त बॅनर लावले आहेत. ते पालकमंत्री नसून बॅनरमंत्री आहेत."अशी टीका केली होती. या दोन नेत्यांत  निवडणुकीदरम्यान जोरदार टीका झाली होती. 
आज विजय मिळाल्यावर रोहित पवार यांनी चौंडी येथील राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईंचे दर्शन घेत संवादाचे एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी आईंचे दर्शन घेताना विकासासाठी आशीर्वाद देण्याची साद घातली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com