Rohit Pawar To Take Interview of Sasson Dean Today | Sarkarnama

आमदार रोहित पवार आज 'मुलाखतकारा'च्या भूमीकेत

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या साथीवर जनजागृती करण्यासाठी आमदार रोहित पवार आज स्वतः 'ससून'चे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांची मुलाखत घेणार आहेत

पुणे : आमदार रोहित पवार हे अनेकदा अनोखे उपक्रम राबवून अन्य राजकारण्यांपेक्षा वेगळा मार्ग शोधतात. अभिनव कल्पना राबवल्यामुळेच ते तरुण पिढीतही लोकप्रिय आहेत. देशात आज कोरोना व्हायरसमुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय रोहित पवार यांनी घेतला आहे. 

कोरोना विषाणूच्या साथीवर जनजागृती करण्यासाठी ते आज स्वतः 'ससून'चे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांची मुलाखत घेणार आहेत. पवार हे स्वतः ससून रुग्णालयात जाऊन या साठी विषयी जनसामान्यांमध्ये ज्या शंका आहेत त्याची उत्तरे चंदनवाले यांच्याकडून मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. एखाद्या आमदाराने दुसर्‍याची मुलाखत घेण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. 

रोहित हे अनेकदा अनोखे उपक्रम राबवून अन्य राजकारणी व्यक्तींपेक्षा वेगळा मार्ग शोधतात. या मुलाखतीचे  'फेसबूक लाईव्ह'द्वारे थेट  प्रक्षेपण होणार असून नागरिकही त्यावर प्रश्न विचारून आपले शंका-समाधान करुन घेऊ शकतात. आज सायंकाळी साडेपाच वाजता ही मुलाखत होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख