राम शिंदे हे तर बॅनरमंत्री! 

राम शिंदे हे तर बॅनरमंत्री! 

मी राज्यातील अनेक मतदारसंघात फिरलो पण एकाही आमदारांनी गावोगावी केलेल्या विकासकामांचे बोर्ड लावलेले नाहीत.

पुणे : "नगरचे पालकमंत्री राम शिंदे हे आता बॅनरमंत्री झाले आहेत. गावोगावी त्यांनी विकासकामांचे बॅनर लावले आहेत. त्या बॅनरमध्ये उल्लेख केलेली कामे गावातील लोक शोधत आहेत पण लोकांना सापडत नाहीत. जी कामे गेल्या दहा वर्षात केलीच नाहीत त्या कामाची बॅनरबाजी का ?"असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी केला.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आज जामखेड येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, अंकुश काकडे  उपस्थित होते. 

पवार म्हणाले,"राम शिंदे यांच्यासारखा सामान्य कुटुंबातील माणूस आमदार व्हावा म्हणून २००९ साली इथल्या गोरगरीब लोकांनी त्यांना उदंड साथ दिली. तन मन आणि धनाने लोक त्यांच्यासोबत उभे राहिले. अगदी १० रुपयांपासून हजार रूपयापर्यत लोकांनी त्यांना निवडणुकीसाठी मदत केली. आमदार झाल्यावर, मंत्री झाल्यावर मात्र शिंदेसाहेब या लोकांना विसरले होते. पण गेल्या तीन महिन्यांपासून मात्र त्यांच्या वागण्यात एकाएकी बदल झाला आहे. त्यांना जुनी माणसं, जुने मित्र आठवू लागले आहेत. या अचानक झालेल्या बदलाची लोक चर्चा करत आहेत."

"मी राज्यातील अनेक मतदारसंघात फिरलो पण एकाही आमदारांनी गावोगावी केलेल्या विकासकामांचे बोर्ड लावलेले नाहीत. कर्जत जामखेडमध्ये मात्र गावोगावी बोर्ड लागले आहेत आणि या बोर्डवर न केलेली कामेही आहेत. गावोगावचे बॅनर पाहून शिंदेसाहेब पालकमंत्री आहेत की बॅनरमंत्री असा प्रश्न पडतोय. गावागावात बोर्ड लावले आहेत पण जामखेड शहरात मात्र त्यांनी बोर्ड लावले नाहीत कारण तिथं बोर्ड लावावा असं ठोस काम त्यांनी केलेले नाही ,"असेही  पवार म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com