आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी भेट झाली रोहित पवार आणि अमित ठाकरेंची!

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी भेट झाली रोहित पवार आणि अमित ठाकरेंची!

पुणे : शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात निर्माण झालेले जिव्हाळ्याचे संबंध आता पुढील पिढ्यांतही आले आहेत. राज यांचे चिरंजीव अमित आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार या दोघांची आज भेट झाली. एकत्रित भोजनही झाले. 

या भेटीला निमित्त होते रोहित यांच्या `सृजन' च्या व्यासपीठाचे. सृजन क्रिकेट , सृजन कबड्डी ,सृजन भजन असे विविध यशस्वी उपक्रम रोहित राबवितात. त्यांनी आता फुटबाॅल खेळाडूंना व्यासपीठ मिळावे म्हणून ' सृजन फुटबॉल 'स्पर्धेचे आयोजन येत्या ऑगस्ट महिन्यात केले आहे. त्यासाठी अमित ठाकरे यांची भेट घेऊन सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण रोहित यांनी दिले. 

या भेटित साहजिकपणे राजकीय चर्चाही झाल्याचे रोहित यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे. ``तरुणांच्या अनेक मुद्द्यांवर अमित ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. विशेषतः पक्षासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे तरुण कार्यकर्ते  जे नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या भूमिकेविरुद्ध बाजू मांडत असतात त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी करण्याची गरज असलेल्या उपायांवर चर्चा झाली. युवक म्हणून पक्षबांधणीचे काम करत असताना आम्हाला या तरुण कार्यकर्त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजत आहेत. योग्य विचारांवर चालणाऱ्या , या विचारांचे समर्थन करणाऱ्या अशा तरुणांमागे आम्ही नेहमीच खंबीरपणे उभा असणार आहोत,``असे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आज असताना अमित ठाकरे आणि रोहित हे दोघे स्वतंत्रपणे भेटले, हा देखील आजचा योगायोग! अमित यांनी आदित्य यांना शुभेच्छा दिल्या की नाही हे माहीत नाही पण अमित आणि रोहित यांची भेट मनसे आणि राष्ट्रवादीतील स्नेहबंध अधिक दृढ करणारी ठरू शकेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com