Rohit Pawar made available disinfectants | Sarkarnama

कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांच्याकडून फवारणीसाठी जंतुनाशके

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी जंतूनाशके उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी दिली

कर्जत  : आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी जंतूनाशके उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून तीन पिंपे जंतुनाशक फवारणी औषध उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींना हे जंतुनाशक औषध वितरित करण्यात आले आहे. तेथे लगेचच फवारणी सुरू करण्यात आली आहे. तशा सूचना संबंधित गावातील ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. कर्जत तालुक्यातील बहुतेक गावांतील नागरिकांनी बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश बंद केला आहे.

जे येणार आहेत, त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी गावात येणाऱ्या वाहनांवरही जंतुनाशके फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जंतुनाशके उपलब्ध व्हावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत होती. आता आमदार पवार यांनी ती उपलब्ध करून दिली असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मोकाट हिंडू नका नाहीतर...

नागरिकांनी विनाकारण बाहेर निघू नये. स्वतःची सुरक्षा स्वतःच्याच हातात आहे. जितकी गर्दी टाळला तितका फैलाव होणार नाही. प्रत्येक गावातील सार्वजनिक पार, बाक अथवा गावातील जिथे पाच किंवा त्यापेक्षा अधिक माणसे बसू शकतील, अशा ठिकाणी डांबर वा वंगण टाकण्यात येईल. तसेच पोलिसांची गस्त सुरू आहे. विनाकारण मोकाट हिंडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख