rohit pawar on kukadi water | Sarkarnama

कर्जतसाठी 'कुकडी'चे पाणी आणायचे आहे : रोहित पवार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

तुम्हाला जेवढी भूक लागली आहे, तेवढीच विकासाची भूक मलाही लागलेली आहे. 

कर्जत (नगर) : 'कुकडी'मधून कर्जतसाठी नमूद केले गेलेले पाणी आपल्याला आणायचे आहे.  गावागावांतील उत्तुंग प्रतिसाद पाहता, माझी जबाबदारी वाढली आहे,'' असे प्रतिपादन 'राष्ट्रवादी'चे उमेदवार रोहित पवार यांनी गावभेटीत ठिकठिकाणी बोलताना केले. 

तालुक्‍यातील जळकेवाडी, लोणी मसदपूर, खातगाव, आंबीजळगाव, कुंभेफळ, कोळवडी, कुळधरण, तोरकडवाडी, थेरवडी आदी भागांत रोहित पवार यांनी भेट दिली. त्या वेळी शेतकरी- ग्रामस्थांशी संवाद साधला. पाणीप्रश्नावर राज्य सरकार आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर टीका केली. "पुढच्या काळात या मतदारसंघातले प्रश्न मी मार्गी लावणार आहे. ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली आहे. आता विरोधकांनी काहीही प्रलोभने दाखविली, तरी त्यांना बळी पडू नका. शेतीसाठी पाण्याचा प्रश्न मिटला तर हा भाग समृद्ध होणार आहे. मात्र, हक्काच्या पाण्यापासून मंत्र्यांनी आम्हाला दूर ठेवले. पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,'' असे ते म्हणाले.

"युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न बिकट आहे. येथील युवकांना शिक्षणानंतर बाहेरचा रस्ता धरावा लागतो आहे. तसेच, दोन्ही तालुक्‍यांत प्रतिभावान खेळाडू आहेत, कुस्तीपटू आहेत; मात्र त्यांना स्वतःची गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळत नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची सृजन साहेब चषक कुस्ती स्पर्धा आयोजित केली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच, नोकरी महोत्सव आयोजित केला होता. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पन्नासच्या वर मोठमोठ्या कंपन्या आल्या होत्या. महिलांसाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले, आरोग्य शिबिरे घेण्यात आली,'' असेही पवार यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख