पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आमदार रोहित पवार यांच्यातर्फे जेवण

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकरिता पुणे येथे वास्तव्यास असलेल्या कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाबरोबरच राज्याच्या विविध भागातील साडेसातशे ते आठशे विद्यार्थ्यांना आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून 'सृजन फौंउंडेशन' व 'एमपीएससी स्टुडन्ट राइट्स; या संस्थांच्या माध्यमातून तीन दिवसांपासून मोफत जेवण व्यवस्था सुरू करण्यात आली आहे
MLA Rohit Pawar Initiated Food Supply to MPSC Students
MLA Rohit Pawar Initiated Food Supply to MPSC Students

जामखेड  : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकरिता पुणे येथे वास्तव्यास असलेल्या कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाबरोबरच राज्याच्या विविध भागातील साडेसातशे ते आठशे विद्यार्थ्यांना आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून 'सृजन फौंउंडेशन' व 'एमपीएससी स्टुडन्ट राइट्स; या संस्थांच्या माध्यमातून तीन दिवसांपासून मोफत जेवण व्यवस्था सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी दाखवलेला पुढाकार आदर्श ठरतो आहे. पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची सर्वात मोठी अडचण त्यांच्या जेवणाच्या खानावळी बंद झाल्यामुळे या विद्यार्थ्यांसमोर दोन वेळच्या जेवणाची मोठी गैरसोय निर्माण झालेली होती. ती गैरसोय ओळखून आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या  सृजन  फौंडेशन व एमपीएससी स्टुडंट राइटस या संस्थांच्या माध्यमातून या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाय योजना हाती घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. 

या विद्यार्थ्यांना दररोज दोन वेळचे मोफत जेवण देण्याची संकल्पना पुढे आली. मागील तीन दिवसांपासून त्यांनी   मोफत जेवण व्यवस्था सुरू केली आहे. याकरिता पुण्यातील काही महत्त्वाच्या 20 ठिकाणे त्यांनी निवडली आहेत. तसेच जेवणाची वेळही निश्चित केली. विशिष्ट वेळेतच हे जेवण या विद्यार्थ्यांना पुरविले जाते. दररोज 750-800 विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था  केलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पुलाव, पुरी- भाजी, भात-वरण, उपमा आदींचा समावेश आहे. सरकारने ज्या सूचना केलेल्या आहेत. त्या सर्व सूचनांचे पालन  करीत आहेत. पस्तीस जणांची टीम यासाठी काम करीत आहे.‌‌

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com