रोहित पवार पॅटर्न : प्रत्येक गावात तक्रार पेटी आणि झेड.पी.सर्कलला संपर्क कार्यालय 

नागरिकांच्या सोयीसाठी कर्जत आणि जामखेडया दोन्ही तालुक्यात मुख्य आणि जिल्हा परिषद गटात एक संपर्क कार्यालय उघडण्यात येईल.ज्या मध्ये ठराविक वार निवडून मी स्वतः उपस्थित राहून संवाद साधीन. -रोहित पवार
Rohit Pawar
Rohit Pawar

कर्जत :  तीन महिन्यात एकदा प्रत्येक जिल्हा परिषद गटात जनसंवाद बैठक घेणार . तसेच तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला अधिकारी आणि पदाधिकाऱ्या समवेत आढावा बैठक घेतली जाईल. तसेच प्रत्येक गावात सर्वाना दिसेल ,अशा ठिकाणी एक सूचना अथवा तक्रार पेटी ठेवण्यात येईल.ती त्या गटातील जनसंवाद बैठकीत उघडून त्यावर विचारविनिमय केला जाईल असे आमदार रोहित पवार यांनी येथे सांगितले . 

नागरिकांच्या सोयीसाठी कर्जत आणि जामखेड  या दोन्ही तालुक्यात मुख्य आणि जिल्हा परिषद गटात एक संपर्क कार्यालय उघडण्यात येईल.ज्या मध्ये ठराविक वार निवडून मी स्वतः उपस्थित राहून संवाद साधीन, असेही ते म्हणाले .   

तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत.त्या बाबत आयोजित सद्यस्थिती व आढावा बैठकीत ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले,  काही कारणास्तव ज्यांचे पंचनामे राहिले असतील ते येत्या चार दिवसात पूर्ण करावेत. तसा शब्द प्रमुख अधिकाऱ्यांनी दिला आहे.ते सर्वाना समान न्याय देतील असा विश्वास आहे. 

अवकाळी पावसाने झालेले नुकसान खूप मोठेअसून मदती पासून एकही शेतकरी वंचीत राहणार नाही.शेवटच्या शेतकरया पर्यंत मदत पोहोचे पर्यंत मी आपला लोकप्रतिनिधीम्हणून पाठपुरावा करेन, अशी ग्वाही   रोहित पवार यांनी यावेळी दिली . 

मतदारसंघात आपणा सर्वाना समवेत घेत अधिकाऱ्यासह समन्वय साधित काम करायचे आहे बाकी मी आपल्या न्याय आणि हक्कासाठी विधानसभेत भांडण्याचे काम कारेन असेही श्री. पवार म्हणाले . 

ते म्हणाले ,ह्या नैसर्गिक आपत्तीचा सर्वांनी एकत्र सामना करायचा आहे.त्यामुळे शेतकर्यांनी घाबरण्याचे कारण नाही. अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे . मात्र त्यानाही अडचणी मर्यादा याचा सामना करावा लागला. तसेच या ठिकाणी रिक्त जागांचा मोठा प्रश्न असल्याने संख्याबळ कमी पडते आहे. त्या बाबत आपण उचित कार्यवाही करू. कुकडीच्या नुकसान भरपाई पासून जे वंचित राहिलेले आहेत त्या बाबत त्या विभागाच्या मुख्याधिकार्यांना भेटून हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. मात्र ती प्रक्रिया थोडी मोठी असल्याने विलंब होत आहे मात्र जबाबदार अधिकाऱ्यांनी निकाली काढण्याचे आश्वासित केले आहे. 

आमदार पवार पुढे म्हणाले ,  मतदारसंघातील इतर प्रश्न वा समस्यांसाठी विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे.  रस्ते,वीज आणि पाणी या बाबत संबंधित विभागाशी खास बैठक घेत आढवा व सूचना केल्या जातील. मागील पिकांचे ज्यांनी विमा भरला होता मात्र त्यांना तो मिळाला नाही या बाबत संबंधित विमा कंपनीशी चर्चा झाली आहे.या बाबत लवकरच तोडगा निघेल. 

या वेळी गुलाब तनपुरे,प्रा. मधुकर राळेभात, उमेश परहर, श्याम कानगुडे, दादा भांडवलकर, काका तपकीर, नितीन धांडे, ऋषिकेश धांडे, हेमंत मोरे, अशोक जायभाय, नितीन गोलेकर, शहाजी राजेभोसले,  सुरेश शिंदे, प्रांत अर्चना नष्टे, तहसीलदार छगन वाघ, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, गटविकास अधिकारी रुपचंद जगताप यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीला तालुकाभरातून प्रचंड गर्दी झाली होती.या गर्दीमुळे बैठक व्यवस्था कोलमडून पडल्याने अनेक सभागृहाच्या बाहेरच उभे राहावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com