Rohit Pawar gives Five Hundred Leater Sanitizer to Police and Government Staff | Sarkarnama

आमदार रोहित पवारांनी पोलिस, शासकीय कर्मचा-यांसाठी दिले ५०० लिटर सॅनीटायझर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कोरोनाचा वाढता प्रसार चिंतेचा विषय बनला आहे. याविरोधात अहोरात्र लढणा-या आरोग्य व शासकीय कर्मचारी, पोलिसांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ५०० लिटर सॅनीटायझर उपलब्ध करून दिले

नाशिक : 'कोरोना'चा वाढता प्रसार चिंतेचा विषय बनला आहे. याविरोधात अहोरात्र लढणा-या आरोग्य व शासकीय कर्मचारी, पोलिसांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ५०० लिटर सॅनीटायझर उपलब्ध करून दिले. राज्यात विविध शहरांमध्ये शासकीय कर्मचा-यांसाठी आमदार पवार यांची संस्था साहित्य आणि सेवा देत आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात फैलावत असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी व पोलिसांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ५०० लिटर सॅनिटायझर दिले आहे.
 
सध्या जगभरात कोरोना आजाराचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या देशात-राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन चालू असला तरी अत्यावश्यक सेवा बजाविणारे शासकीय कर्मचारी व पोलीस हे मात्र कर्तव्य बजावत आहेत. कर्जत-जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार हे बारामती अॅग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या बारामती ॲग्रो लिमिटेड  कंपनीच्या 'सीएसआर' निधीतून हे ५०० लिटर सॅनिटायझर उपलब्ध केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी हे यांनी ५०० लिटर सॅनिटायझर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. नाशिकच्या शासकीय रूग्णालयात अर्भक मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. तेव्हा आमदार पवार यांनी पुढाकार घेऊन त्यावर उपाययोजना केली होती.  जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी इंन्क्यूबेटर, बेबी वार्मर आदी साहित्य दिले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख