रोहीत पवार अमित ठाकरे यांना म्हणतात...

रोहित पवार यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
rohit-pawar-amit-thackeray
rohit-pawar-amit-thackeray

मुंबई:  राजपुत्र अमित ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश करताच  त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

रोहित पवार म्हणतात, ' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या व राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तिगत पातळीवर एकमेकांना कायमचं सहकार्य राहील.


राजकारणापलीकडे जात ते सर्वांसह मैत्रीपुर्ण संबंध जोपासण्यावर भर देतात.   रोहित पवार यांचा सोशल मीडियावर  मोठा चाहता वर्ग आहे. दोनच दिवसांआधी त्यांनी आपल्याच मतदारसंघातील तरूणाच्या सलुनमध्ये जात केसं कापली होती. त्यांच्या या साधेपणाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com