rohit pawar on development plan | Sarkarnama

विकास हाच केंद्रबिंदू : रोहित पवार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

ग्रामीण भागातील आरोग्य, रोजगार, शिक्षणपद्धती बदलण्याची गरज आहे

- रोहित पवार

नगर : माझ्याकडून काम करताना राजकारण होणार नाही. आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्याला प्राधान्यक्रम असेल. मतदारसंघाचा विकास हाच माझ्या कामाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

बारामती एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने कर्जत येथे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील यांच्यासाठी आयोजित 'चला समृद्ध गाव घडवू या' या कार्यशाळेत पवार बोलत होते.  

पवार म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य, रोजगार, शिक्षणपद्धती बदलण्याची गरज आहे. सर्वांना शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. भविष्यात ग्रामविकास, महिला सबलीकरण, शिक्षण या विषयासंदर्भाने अभ्यासदौरे काढले जातील. त्यामुळे आपल्या कामात नाविन्य येईल.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख