rohit pawar-ajit pawar
rohit pawar-ajit pawar

रोहित पवार यांनी केला काकांचा बचाव!

...

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे 'पोस्टमोटेंम' करताना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवार यांना प्रति मुख्यमंत्री असल्याचा टोला लगावला आणि आपल्या तासाभराच्या भाषणात पवार यांनाच लक्ष्य केले.

आपल्या काकांवरील आरोप खोडून काढताना आमदार रोहित पवारांनी भाषणाच्या सुरवातीलाच मुनगंटीवरांचा उल्लेख प्रति विरोधी पक्षनेते असा करीत आपले काका अजित पवारांवरील आरोपांची परतफेड केली. रोहित पवार यांनी जोरदार भाषण केले. त्यांच्या भाषणाला सत्ताधारी आमदारांनी बाके वाजवून दाद दिली.

विधानसभेत सध्या अर्थसंकल्पावर सध्या चर्चा सुरू आहे. सभागृहातील प्रश्नोत्तरे, लक्ष्यवेधी व औचित्याच्या मुद्दयांचे कामकाज संपल्यानंतर आजच्या पहिल्या तासात मुनगंटीवार यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केले. या भाषणात त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख प्रतिमुख्यमंत्री असा केला. अजित पवार प्रति मुख्यमंत्री आहेत.मात्र, अर्थसंकल्पात काहीही नाही. राज्याच्या जनतेची केवळ फसवणूक आहे. काही योजना केवळ नव्या नावाने सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि साताबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केले आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

रोहित पवार यांनी संपूर्ण भाषणात मुनगंटीवारांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांच्यावरील आरोपाला पवार यांनी दिलेल्या जोरदार उत्तराला सदस्यांकडून जोरदार समर्थन मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com