....आपला गडी लय भारी! रोहित पवारांचा सरकारवर वार

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी सरकारची तुलना चिडक्या लहान मुलाशी केली आहे. लहान मुलांच्या खेळात जसा दुसऱ्याचा चांगला खेळ न पाहवणारा चिडका मुलगा असतो असे सांगत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणाची खिल्ली उडवली आहे.
Rohit Pawar with Sharad Pawar
Rohit Pawar with Sharad Pawar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी सरकारची तुलना चिडक्या लहान मुलाशी केली आहे. लहान मुलांच्या खेळात जसा दुसऱ्याचा चांगला खेळ न पाहवणारा चिडका मुलगा असतो असे सांगत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणाची खिल्ली उडवली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रातील शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेतील अयोग्य कर्जवाटपप्रकरणी 'ईडी'कडून गुन्हा दाखल झाल्यानं राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याबाबत रोहित पवार यांनी या ईडी चौकशी प्रकरणावर टिका केली आहे. 

............लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगला खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसच हे ED च प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगल खेळता येत नसलं की चिडायचं...एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे...........असे रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com