विरोधी पक्षांसाठी 'बिनकामाचे उद्योग' खाते तयार करावे : रोहित पवारांचा चिमटा

वर्गात एखादा असा मुलगा असतो जो स्वत: अभ्यास करत नाही पण हूशार मुलांची पुस्तके दडवून त्याला कसे कमी मार्क पडतील याचा आटोकाट प्रयत्न करतो. विरोधी पक्षाचे लोक सध्या हे एकमेव काम अगदी प्रामाणिकपणे करतात असा चिमटा आमदार रोहित पवार यांनी काढला आहे
Rohit Pawar taunts Opposition Parties
Rohit Pawar taunts Opposition Parties

पुणे : ''विरोधी पक्षाचे सध्याचे काम पहाता 'बिनकामाचे उद्योग खाते' जाहीर करावं. कारण विरोधी नेते मंडळी पहिल्या दिवशी सभागृहाबाहेर महिलांच्या प्रश्नांवरुन आवाज उठवतात. पण सभागृहात जेव्हा महिलांच्या प्रश्नावरून लक्षवेधी मांडण्यात येते तेव्हा इतर मुद्यांवरून गोंधळ घालून आपले खरे रंग दाखवतात,''अशी खंत आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली.

आपल्या फेसबूक पेजवर रोहित पवार म्हणतात....वर्गात एखादा असा मुलगा असतो जो स्वत: अभ्यास करत नाही पण हूशार मुलांची पुस्तके दडवून त्याला कसे कमी मार्क पडतील याचा आटोकाट प्रयत्न करतो. विरोधी पक्षाचे लोक सध्या हे एकमेव काम अगदी प्रामाणिकपणे करतात. ही मंडळी पहिल्या दिवशी सभागृहाबाहेर महिला प्रश्नांवरुन आवाज उठवतात पण सभागृहात जेव्हा महिलांच्या प्रश्नावरून लक्षवेधी मांडण्यात येते तेव्हा इतर मुद्यांवरून गोंधळ घालून आपले खरे रंग दाखवतात. विरोधासाठी विरोध करण्याहून सभागृहात शांततेत चर्चा करून प्रश्न सोडवणं अधिक गरजेच आहे.

......महाविकास आघाडीमार्फत कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी सह मित्रपक्ष एकत्रित येवून महिलांच्या सुरक्षेसंबधात चर्चा करत आहेत अशा वेळी भाजपची मंडळी गोंधळ घालत आहेत. पाच वर्षानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा मात्र हीच मंडळी प्रचारात अगदी त्वेषाने महिला सुरक्षेतेवर बोलण्याचे नाटक करतील तेव्हा त्यांना आठवणीने विचारा, की महिला सुरक्षेच्या लक्षवेधीवर चर्चा सुरू होती तेव्हा आपण काय करत होतात?.....असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com