Rohit Pawar Avoided Felicitations in Nagar | Sarkarnama

पीक पाहणीसाठी आलेल्या रोहित पवारांनी सत्कार टाळले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

जामखेडमधील मिरवणुकींनंतर आमदार रोहित पवार यांनी आता नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. काल जामखेड येथे त्यांनी भेटी देत शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासने दिली. आज कर्जत तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. या वेळी कार्यकर्त्यांकडून होणारे सत्कार मात्र त्यांनी नम्रपणे टाळले.

कर्जत (नगर)  : जामखेडमधील मिरवणुकींनंतर आमदार रोहित पवार यांनी आता नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. काल जामखेड येथे त्यांनी भेटी देत शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासने दिली. आज कर्जत तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. या वेळी कार्यकर्त्यांकडून होणारे सत्कार मात्र त्यांनी नम्रपणे टाळले.

तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या औटेवाडी, खेड, अखोणी, करपडी, बाभूळगाव, शिंपोरा, बारडगाव दगडी, बारडगाव सुद्रिक, भांबोरा, दुधोडी, बेलवंडी, राक्षस वाडी, कुळ्धरण, कोपर्डी, शिंदे, नांदगाव, रेहकुरी आणि माहिजळगाव येथे भेट देत प्रत्यक्ष बांधावर जात पिकांच्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांशी बोलताना पवार म्हणाले, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. मी लोकप्रतिनिधी म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहील. नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासंदर्भात प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून, या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीन, असी ग्वाही रोहित पवार यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख