राष्ट्रवादीच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदासाठी रोहित पाटील स्पर्धेत नाहीत...ही नावे चर्चेत - rohit patil not in race for ncp student state president post | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदासाठी रोहित पाटील स्पर्धेत नाहीत...ही नावे चर्चेत

महेश जगताप
शुक्रवार, 6 मार्च 2020

पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुदत संपल्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता रिक्त झालेल्या विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुदत संपल्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता रिक्त झालेल्या विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या पदासाठी पुण्याचे सनी मानकर, आकाश झांबरे पाटील, औरंगाबादचे ऋषिकेश देशमुख, बीडचा दयानंद शिंदे,जळगावचे भूषण भदाणे ,त्याचबरोबर सोलपरमधून विकी वाघे इच्छुक आहेत. नांदेड,हिंगोली व इतर भागातून  बरेच जण इच्छुक आहेत. या पदासाठी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचेही नाव चर्चेत होते. मात्र रोहित हे या पदासाठी इच्छुक नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यामुळे या स्पर्धेतून एक प्रमुख नाव मागे पडले आहे.

आगामी काळात पक्षाकडून युवकांना अधिक संधी देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट केले होते. तसेच पवारांनी अनेक युवकांना आमदारही केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीप्रमाणेच विद्यार्थी आघाडीला देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच रिक्त झालेल्या विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसला युवकांमध्ये स्थान मिळवायचे असल्याने चांगला चेहरा पक्ष शोधत आहे. तसेच खुद्द शरद पवार यांनी महाविद्यालयीन निवडणुका घेण्याची सूचना केली आहे. या निवडणुकांत पक्षाची विद्यार्थी आघाडी सक्षम करण्याकडे नेत्यांचा कल आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख