rohini shendgae is group leader of shivsena | Sarkarnama

शिवसेना नगरसेवकांचे नेतृत्व रोहिणी शेंडगे यांच्याकडे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

राष्ट्रवादीने मात्र अद्याप गटनोंदणी केली नाही.  

नगर: महापालिकेतील नगरसेवकांची गटनोंदणी आज शिवसेना, भाजप व काँग्रेस पक्षाने आज नाशिकला केली. तिनही पक्षाने गटनेतेपदी महिलांना संधी दिली.  

दरम्यान, राष्ट्रवादीने अद्याप गटनोंदणी केली नाही 

शिवसेनेने आज सर्व २४ नगरसेवकांची गटनोंदणी नाशिक विभागीय आयुक्तांसमोर केली. गटनेतेपदी रोहिणी शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

भाजपचे १४ नगरसेवक आहेत. त्यांनीही आजच गटनोंदणी करून गटनेतेपदी मालन ढोणे यांची नियुक्ती केली आहे. माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्यावर गटनोंदणी करून घेण्याची जबाबदारी खासदार दिलीप गांधी यांनी टाकली होती. काँग्रेसच्या पाच नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्यात आली. गटनेतेपदावर सुप्रिया जाधव यांची वर्णी लागली.  

बहुजन समाज पक्षाचे चारही नगरसेवक नाशिकला रवाना झाले आहेत. त्यांचीही स्वतंत्रपणे गटनोंदणी होणार आहे. राष्ट्रवादीने मात्र अद्याप गटनोंदणी केली नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख