नाथाभाऊंच्या पक्षांतरांच्या उगाचच चर्चा केल्या जात आहेत : रोहिणी खडसे

नाथाभाऊ पक्षात आहेत,ते पक्षाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या पक्षांतरांच्या उगाचच चर्चा केल्या जात आहेत.
Eknath Khadse With Daughter Rohini khadse
Eknath Khadse With Daughter Rohini khadse

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेतील उत्तर महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांच्या नाशिक येथील बैठकिला आपण मुलीची तब्बेत खराब असल्याने गेलो नाही अशी माहिती भाजपच्या ऍह.रोहिणी खडसे यांनी दिली.


भारतीय जनता पक्षातर्फे राज्यातील विधानसभेत पक्षाच्या पराभूत उमेदवारांच्या बैठका घेवून त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांची बैठक आज नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुक्ताईनगर येथील पक्षाच्या उमेदवार ऍड.रोहिणी खडसे या बैठकिला अनुपस्थित असल्यामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात होते. सद्यस्थिती त्यांचे वडिल व माजी मंत्री भाजप नेते एकनाथराव खडसे हे पक्षांतर करण्याची चर्चा सुरू आहे.त्यामुळे त्या या बैठकिला उपस्थित नसल्याची चर्चा सुरू होती. 


याबाबत ऍड.रोहिणी खडसे यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, पक्षातर्फे आपणास नाशिक येथील बैठकिचे आमंत्रण आले होते. परंतु मुलींची तब्बेत बिघडल्याने आपण त्या बैठकिस उपस्थित राहू शकलो नाही.याबाबत आपण पक्षाच्या नेत्यांनाही कळविले आहे.

खडसेंच्या पक्षांतरांच्या चर्चेबाबत त्या म्हणाल्या, नाथाभाऊ पक्षात आहेत, ते पक्षाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या पक्षांतरांच्या उगाचच चर्चा केल्या जात आहेत. अशा चर्चाना कोणताही अर्थ नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com