Road blockade agitation In Shahapur | Sarkarnama

समृद्धी विरोधात शहापूरला चक्का जाम

विजय पगारे : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 26 एप्रिल 2017

इगतपुरीत शंभर टक्के विरोध असूनही शासन आत्ता मोजणीपर्यंत पोहोचतंय शासनाने दिशाभूल करू नये अन्यथा मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल.

- निर्मला गावित , आमदार, इगतपुरी

शहापुर :- येथे मुंबई आग्रावर समृध्दी महामार्गास विरोध म्हनुन भर उन्हात रास्ता रोको करतांना संतप्त शेतकरी तर दुसऱ्याछायाचित्रात सहभागी झालेले खासदार राजु शेट्टी ,आमदार बरोरा ,निर्मला गावित तर तिसऱ्या छायाचित्रात कार्यकर्त्योना अटक करतांना पोलीस यंत्रणा 

 

शहापूर, ता 26 :- प्रस्तावित मुंबई नागपुर समृध्दी महामार्गास जमीनी संपादीत करण्यासाठी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असुन शासनाच्या विरोधात नाशिक जिल्हा समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समिती,शेतकरी व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी आज मुंबई आग्रा महामार्गावरील शहापुर येथे भर उन्हात जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा काढुन,चक्का जाम करीत आणि रास्ता रोको करुन जोरदार विरोध कायम दर्शविला आहे . 

या मोर्चात शासन विरोधात शेतकरी कृती समितीच्या वतीने शहापूर येथे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी,शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, इगतपुरीच्या आमदार निर्मलाताई गावित , आमदार आनंद ठाकूर ,कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दीड तास रास्ता रोको करण्यात आला हजारो बाधितांना अटक करून लागलीच सुटका करण्यात आली . 

याप्रसंगी मी जरी सरकारमध्ये असलो तरी सरकारचा गुलाम नाही तर सदैव शेतकऱ्यांसोबत राहणार इगतपुरीसाठी हा समृद्धी महामार्ग नसून बरबादीचा मार्ग असल्याचे आमदार गावित म्हणाल्या तर हा मार्ग रद्द न केल्यास मुंबईचे पाणी बंद करण्याचा इशारा आमदार बरोरा यांनी दिला .

यावेळी शेतकरी कृती समितीचे कचरू पा डुकरे ,भास्कर गुंजाळ यांच्यासाहित शेकडो बाधितांना अटक करून सुटका करण्यात आली सिन्नर इगतपुरी तालुक्यातून विरोधाची धार तीव्र झाल्याचे यावेळी दिसून आले भर उन्हातही दहा हजाराच्या वर संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी हजर होते. 

दरम्यान शासनाने प्रस्तावित केलेल्या मुंबई नागपुर समृध्दी महामार्ग व कृषी विकास केंद्रसाठी शहापुर तालुक्यातील 32 व इगतपुरी तालुक्यातील एकुण 22 गावांतुन जाणार असुन परिणामी तालुक्यातील शेतकरी पुर्णतः देशोधडीला गेल्या शिवाय राहणार नाही.

प्रस्तावित समृध्दी महामार्गासाठी 450 हेक्टर व कृषी विकास केंद्रासाठी 1हजार 400 हेक्टर जमीनी दिल्यास एकुण 56 हजार 744 हेक्टर जमीन होते.यामुळे शिल्लक फक्त 26 हजार 068 हेक्टर इतकेच क्षेत्र शिल्लक राहणार असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.अशा जनभावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या .

इगतपुरी तालुक्याने अनेक प्रकल्पाना जमिनी दिल्यात आता काही गुंठ्यावर शेतकरी आला असून महामार्ग दुसरीकडे वळवुन इगतपुरी तालुका टाळावा - भास्कर गुंजाळ,प्रकल्प बाधीत 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख