कायद्यातील बदलानंतरही अपघातातील बळींची संख्या वाढतीच...

कायद्यातील बदलानंतरही अपघातातील बळींची संख्या वाढतीच...

नवी दिल्ली : अपघातांची व त्यातील बळींची संख्या घटविणे हा मोटार वाहन कायद्याचा एक मुख्य उद्देश असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्ष चित्र वेगळेच दिसत असून, मागच्या एका वर्षात देशातील अपघातात आपला जीव गमावलेल्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे रस्ते-महामार्ग मंत्रालयाची आकडेवारी सांगते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत ही बाब मान्य केली. 

महाराष्ट्रात सप्टेंबर 2018 पासूनच्या 2 वर्षांत तब्बल 19 हजार 300 जणांना जीव गमवावे लागले आहेत. दरम्यान गडकरी यांच्या मंत्रालयाने मात्र आकड्यांचा खेळ करताना सप्टेंबर 2018- सप्टेंबर 2019 या वर्षआत अपघआतांची संख्या 2.2 टक्‍क्‍यांनी तर मृतांची संख्या 0.2 टक्‍क्‍यांनी घटली असे सांगितले. मात्र त्याच बाबूशाहीने तयार केलेल्या व संसदेत सादर झालेल्या राज्यवार कोष्टकाचा अभ्यास केला तर अपघातांत जीव गमावलेल्यांबद्दल हे चित्र वेगळे दिसत आहे. 

मागच्या वर्षी (2018) देशात एकूण 3 लाख 806 अपघात झाले व त्यात 1 लाख 12 हजार 469 जणांना जीव गमवावा लागला. यंदा आतापावोतो (सप्टेंबरपर्यंत) अपघाताची संख्या 3 लाख 39 हजार 135 आहे. मात्र मृतांचा आकडा 1 लाख 12 हजार 735 इतका वाढला आहे. जखमींची संख्या गेल्या दोन वर्षांत पाऊण लाखाच्या आसपास गेली आहे. 

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर राज्यात 2018 सप्टेंबर ते 2019 सप्टेंबर या काळात 26 हजार 169 अपघात झाले व त्यात 9821 जणांनी जीव गमावले. यंदा सप्टेंबरपर्यंत अपघातांची संख्या 25, 130 होती व मृतांची संख्या 9463 होती. 
उद्‌घाटनाला यांनाही बोलवा.... 
मुंबई गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू असून आगामी एका वर्षात हा चार पदरी सिमेंट कांग्रीकटचा महामार्ग पूर्ण होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. विविध महामार्गांच्या कामांची संख्या घटण्यामागे जमीन संपादन, विविध मंत्रालयांच्या परवानग्या व बॅंकांनी अर्थपुरवठा करण्यात अडथळे आणणे ही मुख्य कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई गोवा महामार्गाबाबत महाराष्ट्रातील मागच्या कॉंग्रेस आघाडी सरकारमुळे विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभापती वेंकय्या नायडू यांनी, महामार्गाचे उद्‌घाटन कराल तेव्हा यांनाही आमंत्रित करा, असे सांगताच हास्याची लकेर उमटली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com