r.k. dhanavade | Sarkarnama

मंत्रालय अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी रा. को धनावडे

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनाम ब्युरो
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई : मंत्रालय अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी उपसचिव रा. को. धनावडे यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारणीची निवड करण्यासाठी मंत्रालय अधिकारी संघटनेची सर्वसाधण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अध्यक्षपदी उप सचिव रा. को धनावडे यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली. 

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या न्याय मागण्या व अधिकारासंबंधी संघटन काम करते. या संघटनेच्या 2017 - 18 साठी अध्यक्षपदी उपसचिव रा. को. धनावडे यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्ष पदी विजय चौधरी, सचिव विष्णू पाटील, खजिनदार उदय चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख