Rituja Patil, from Canada, says, "Join Modi's lockdown! Listen to what he is saying! '' | Sarkarnama

कॅनडाहून वैमानिक ऋतुजा पाटील म्हणतात,"" मोदींच्या लॉकडाऊनला साथ द्या! जे सांगत आहे ते ऐका ! '' 

संपत मोरे
गुरुवार, 26 मार्च 2020

"कोरोनाच्या व्हायरसने सगळीकडे हाहाकार माजवला आहे.सगळं जग चिंतेत आहे.कॅनडा मध्ये दोन हजारांपेक्षा जास्त लोक कोरोना पॉझीटिव्ह आहेत.इथल्या सरकारने शाळा कार्यालये बंद केली आहेत.

पुणे : "तुम्ही केंद्रसरकार,राज्यसरकार जे सांगत आहे ते ऐका. घराच्या बाहेर पडू नका. लॉकडाऊनला साथ द्या. शासन त्यांच्या पातळीवर काम करत आहे. तुम्ही त्याना साथ द्या." असे आवाहन कॅनडा मधून ऋतुजा राजन पाटील यांनी देशातील जनतेला केले आहे. 

सर्वत्र कोरोना वायरसने हाहाकार माजवला असताना सर्वच स्तरातून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या कॅनडा येथे वैमानिक असलेल्या कन्या ऋतुजा पाटील यांनी कॅनडा येथील परिस्थिती बाबत माहिती देत भारत सरकारने व राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला पाठबळ देत घरातून बाहेर पडू नका आणि स्वतःची काळजी घेत लॉक डाऊन पाळा अशी विनंती व्हिडीओवरून आपल्या भूमीतील नागरिकांना केली आहे. 

त्यांनी पाठवलेल्या व्हिडीओत कॅनडातील गंभीर परिस्थिती सांगत भारतातील लोकांनी लॉकडाऊन पाळावा असे आवाहन केले आहे.

त्या म्हणतात."कोरोनाच्या व्हायरसने सगळीकडे हाहाकार माजवला आहे.सगळं जग चिंतेत आहे.कॅनडा मध्ये दोन हजारांपेक्षा जास्त लोक कोरोना पॉझीटिव्ह आहेत.इथल्या सरकारने शाळा कार्यालये बंद केली आहेत.

सगळे लोक घरात बसून आहेत.आपल्या देशातील लोकांनीही घरात बसावं.घराच्या बाहेर पडू नये.शासन जे सांगत आहे ते ऐकावे.लॉकडाऊन ला पूर्णपणे साथ द्यावी.डॉक्‍टर आणि सरकार आपल्यासाठी काम करत आहे.आपण घरात बसून त्यांना सहकार्य करावे."असे आवाहन पाटील यांनी केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख