ritesh deshmukh to interview ashok chavan | Sarkarnama

गंभीर अशोक चव्हाणांना रितेश देशमुख बोलते करणार!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

औरंगाबादः सिनेअभिनेता रितेश देशमुख आज नांदेडमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व त्यांच्या पत्नी अमिता यांची मुलाखत घेणार आहेत. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्ताने या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

अशोक चव्हाण हे नेहमीच संयमित बोलतात. खालच्या पातळीवरील टीका टाळतात. त्यांचे भाषण विलासराव देशमुखांप्रमाणे हास्याचे स्फोट घडवून आणत नाहीत. गंभीर अशी त्यांच्या संवादाची प्रकृती असते. त्यामुळे त्यांना बोलते करण्यासाठी रितेश देशमुख काय ट्रिक वापरणार, याची उत्सुकता आहे. 

"स्व. शंकरराव चव्हाण- त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरेतून' अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाच्या प्रागंणावर सांयकाळी 7 वाजता ही मुलाखत रंगणार आहे.

"आनंदाचे डोही' असे नाव असलेल्या या मुलाखतीतून दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांचे कौटुंबिक आयुष्य, करड्या शिस्तीचे भोक्ते तसेच त्यांच्या हदयाचा हळवा कोपरा, मुलांना आणि नातवंडांना त्यांनी दिलेली शिकवण, केलेले संस्कार अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्व.डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी केले आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख