रिटा भाकरेंचे नगरसेवकपद धोक्यात : मनपा कामगारांचा संप मागे

नगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आयुक्तांकडून कारवाईचे आश्वासन
nagar corporation rita bhakare
nagar corporation rita bhakare

नगर : शहरात फवारणी करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करणाऱ्या नीलेश भाकरे याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, तसेच नगरसेविका रिटा भाकरे यांचे नगरसेवकपद रद्दबाबत सोमवारी प्रस्ताव दाखल करू, असे आश्वासन मिळाल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी आज संप मागे घेतला. नागापूर परिसरात जंतुनाषकाची फवारणी करीत असताना नीलेश भाकरे यांनी एका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याने हा संप पुकारला होता.
 
निलेश भाकरे हा रिटा भाकरे यांचा नातेवाईक आहे. त्यामुळे नगरसेविकेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा पवित्रा कामगार संघटेनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे यांनी घेतला होता. गेल्या दोन दिवसांपासून महापालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढिग साचले होते. सध्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे नियोजन असताना कचरा साचल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

आरोपीस अटक करणार
आज आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेचे अधिकारी, पोलिस प्रशासन, कामगार संघटना यांच्यात बैठक होऊन त्यावर तोडगा निघाला. आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल, तसेच नगरसेविकेच्या पद रद्दबाबतचा प्रस्ताव दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले. आरोपी अद्याप फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले. मागण्या मान्य झाल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.

आता औषध फवारणी केवळ दिवसाच
यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जंतुनाषकांची फवारणी दिवसा व रात्रीही केली जात होती. रात्री लोक झोपलेले असतात. त्यामुळे फवारणी करण्यास अडथळे येत नाहीत. त्यामुळे रात्री फवारणी केली जात होती. तथापि, दोन दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यास रात्रीच्या वेळी मारहाण झाली. त्यामुळे यापुढे रात्रीच्या वेळी कोणीही फवारणीचे काम होणार नाही, असा निर्णय कामगार संघटनेने घेतला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com