'वंचित'मध्ये उभी फूट; दोन माजी आमदारांचे राजीनामे  

अकोला जिल्ह्यातील दोन माजी आमदारांसह 48 पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिली. राजीनामा देणाऱ्यांनी पक्षातील विश्‍वासार्हतेवर नाराजी व्यक्त केली आहे.
rift in vanchit bahujan aaghadi
rift in vanchit bahujan aaghadi

अकोला : लोकसभा निवडणुकीत 41 लाख व विधानसभा निवडणुकीत 24 लाखांपेक्षा अधिक मतं मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. अकोला जिल्ह्यातील दोन आमदारांसह राज्यभरातील 48 पदाधिकाऱ्‍यांनी शनिवारी (ता. 22) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

पक्षातील विश्‍वासार्हता संपल्यामुळे आम्ही सर्वजन राजीनामा देत असल्याचा उल्लेख सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सामूहिक राजीनामा पत्रात केला आहे.

भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी 2019 च्या 17 व्या लोकसभेसाठी 'वंचित बहुजन आघाडी'च्या माध्यमातून महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या दोन प्रस्थापित आघाड्यांना पर्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नावाने तिसरी आघाडी उभी केली. वंचित घटकांना सोबत घेवून सत्ता संपादन करण्याचा उद्देश्‍य समोर ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढविली. 

या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना 41 लाख मतं मिळाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा पक्षाला 24 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली. लाखोंच्या संख्येने मतं मिळाल्यानंतर सुद्धा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नाही.  

दरम्यान शनिवारी (ता. 22) पुन्हा वंचितमध्ये मोठी फूट पडली. अकोला जिल्ह्यातील दोन माजी आमदारांसह 48 पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिली. राजीनामा देणाऱ्यांनी पक्षातील विश्‍वासार्हतेवर नाराजी व्यक्त केली आहे.
 
यांनी दिले राजीनामे:
पक्षातील विश्‍वास संपल्यामुळे पदाचा राजीनामा देत असल्याचा उल्लेख वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सामूहिक राजीनाम्यात केला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे, बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार, वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, इम्रान पुंजाणी, देखरेख समिती प्रमुख अर्जून सलगर, हनुमंत वाघे, बुलडाणा लोकसभा संपर्क प्रमुख प्रा. सदानंद माळी, बापूसाहेब हटकर, माजी जिल्हाध्यक्ष जालना अब्दुल रौफ, चंद्रकांत जानराव, औरंगाबाद लोकसभा संपर्क प्रमुख मुकुंद सोनवणे, नागपूर धनगर युवक अध्यक्ष रमेश पाटील, पुरुषोत्तम डाखोडे (नागपूर), अशोक जंगले-महाड, दिनकर नागे- माजी जि.प. सदस्य अकोला, बिसमिल्ला खान (बार्शीटाकळी), विशाल पोळे (यवतमाळ), शेखर बंगाळे (सोलापूर), शिवाजीराव ढेपले (निफाड), विनायक काळदाते (नाशिक), ज्ञानेश्वर ढेपले (नाशिक), सदाशिव वाघ (नाशिक), गणेश ढवळे (नागपूर), सुरेश मुखमाले (वाशिम), राजू गोरडे (वर्धा), संगीता तेलंग (महासचिव), सुनीता जाधव (इशान्य मुंबई), सागर गवई (मुंबई), प्रशांत चव्हाण, संजय आहेर, विजय घावट (अकोला) यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com