नागपूर जिल्हा परिषदेत निवडणुकीच्या आधीच महाआघाडीत फाटाफूट

राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाआघाडी स्थापनेच्या बेतात असलेल्या दोन्ही कॉंग्रेसमध्ये निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला. कॉंग्रेसने अन्याय केल्याने सुमारे राष्ट्रवादीच्या 10 उमेदवारांनी बंडखोरी केली
Rift in Congress NCP At Nagpur Zilla Parishad
Rift in Congress NCP At Nagpur Zilla Parishad

नागपूर  : राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाआघाडी स्थापनेच्या बेतात असलेल्या दोन्ही कॉंग्रेसमध्ये निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला. कॉंग्रेसने अन्याय केल्याने सुमारे राष्ट्रवादीच्या 10 उमेदवारांनी बंडखोरी केली तसेच तीन विधानसभा अध्यक्ष व सहा तालुका अध्यक्षांनी त्यांचे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे पाठविले आहेत.

उमेवादी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने रविवारी दोन्ही कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. बैठकीत कॉंग्रेसतर्फे आमदार सुनिल केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, रमेश बंग व जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर उपस्थित होते. यात ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, कॉंग्रेस आमदार असलेल्या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक जागा व काही पंचायत समितीच्या जागा मिळणार होत्या. हाच फार्म्युला राष्ट्रवादीकडे असलेल्या विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेससाठी लागू होणार होता. तर रामटेक व कामठी मतदारसंघात दोन्ही पक्ष आपल्या ताकदीनुसार लढणार होते.

सोमवारी जिल्हा परिषदेच्या नामांकनाचा अखेरचा दिवस असल्याने 'एबी' फार्म वाटप करण्यात आले. मात्र, जागा वाटप योग्य न झाल्याचा ओरड होऊ लागली. याशिवाय कामठी, मौदा व रामेटक तालुक्‍यात कॉंग्रेसने राष्ट्रवादीसाठी जागा सोडली नाही. यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा पारा चढला. माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केवळ 16 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत, तर पंचायत समितीच्या एकूण 116 जागांपैकी केवळ 18 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार लढत आहेत. 

त्यानंतर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर यांच्याकडे राजीनामे पाठविले. राजीनामा देणाऱ्यांमध्ये विधानसभा अध्यक्षांमध्ये रामटेकचे किशोर बेलसरे, कामठीचे हरदास मेश्राम व उमरेडचे जीवनलाल डोंगरे यांचा समावेश आहे. मौदा तालुकाध्यक्ष आशीष पाटील यांनीही राजीनामा दिला आहे. याशिवाय अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

भाजपच्या दोघांना पळविले

डिगडोह ग्राम पंचायत सदस्य विनोद ठाकरे यांच्या पत्नीला राष्ट्रवादीने डिगडोह सर्कलमधून उमेदवारी दिली. ठाकरे आमदार समीर मेघे यांच्या जवळचे आहेत. पत्नीला तिकीट नाकारल्याने ठाकरे यांनी माजी आमदार विजय घोडमारे यांच्याशी संधान साधून तिकीट मिळविले. मांढळ येथेही असाच प्रकार घडला. मांढळचे भाजपचे भागेश्‍वर फेंडर यांना कॉंग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातून तिकीट दिली.

तीन विधानसभा अध्यक्ष व सहा तालुकाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामे दिले आहेत. याबाबातची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली - शिवराज बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com