Revolt against Nagpur City BJP president | Sarkarnama

आमदार कोहळेंच्या विरोधात असंतोष

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 मार्च 2017

नागपूर - शहर भाजपचे अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांच्या विरोधात पक्षातील असंतोष थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून दोन पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.

नागपूर शहर भाजपचे मंत्री विजय आसोले व दक्षिण मंडळाचे बंडू सिरसाट यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप ठेवला आहे. नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली. विशेष म्हणजे हे दोन्ही पदाधिकारी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. याच मतदारसंघातून सुधाकर कोहळे विधानसभेत निवडून गेलेले आहेत. कोहळे यांच्या विरोधातील असंतोष पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमसत असून उमेदवारी वाटपाच्या वेळी अनेक महिलांनीही कोहळेंच्या विरोधात निदर्शने केली होती.

कोहळेंच्या विरोधात असंतोष शांत होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. नुकत्याच निलंबित केलेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी आम्ही एकनिष्ठ असून कोहळे यांच्या एकाधिकारशाहीला अनेकजण कंटाळले असल्याचा आरोप केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख