महसूल अधिकाऱ्यांची संपत्ती वेगाने वाढते : मुनगंटीवार

महसूल अधिकाऱ्यांची संपत्ती वेगाने वाढते : मुनगंटीवार

शिर्डी : शेती करून 25 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांची जमीन 100 एकरवर जाऊ शकत नाही. मात्र कुटुंबातील कोणी राजकारणी अथवा सरकारी खात्यात असेल तर त्यांची शेती पाच एकरवरून 100 एकर होऊ शकते आणि महसूल विभागात असलेल्या अधिकाऱ्याची संपत्ती लवकर वाढते, असा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मारला.

आज राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात मागोवा २०१८ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 
ते म्हणाले की आज शेतकरी व्हायला कोणी तयार नाही. आपला देश कृषी प्रधान असताना अशी वेळ येणं दुर्दैवी आहे. शेती हा मजबुरीचा व्यवसाय बनला असून आज 25 एकर शेती असलेला शेतकरीही  आपल्या मुलाला सरकारी नोकरी शोधतो.

महाराष्ट्राच्या अर्थ विभागाच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचा असून संशोधनासाठी राहुरी कृषी विद्यापीठाला 150 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.


ज्या जातीत जो जन्म घेतो त्याला आपल्या जातीचा अभिमान असतो मात्र त्याला हे माहीत नसतं की जात बुकिंग करून मिळत नसते. जन्माला आला म्हणून त्या जातीचा अभिमान असतो. मात्र आता देवाने जीआर बदललायं, ज्याला आता ज्या जातीचा व्देष वाटतो त्याचा पुढचा जन्म त्याच जातीत होईल, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com