revenue minister balasaheb thoart on ready reckoner rate | Sarkarnama

रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नाहीत!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

संपूर्ण 'लॉक डाऊन'ला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे

संगमनेर (नगर): राज्य सरकारकडून दर वर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून महसूल अधिकारी-कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या वर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नाहीत. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून मुक्त झाल्यावर हे दर जाहीर केले जातील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले, "जीवनावश्‍यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोचतील, यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करीत आहे. धान्याऐवजी थेट पीठच नागरिकांना कसे मिळेल, याबाबत सूक्ष्म नियोजन सुरू आहे. शेतीकामांसाठी 'लॉक डाऊन'दरम्यान निर्बंध नाहीत. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून आलेल्या हार्वेस्टरना पेट्रोलपंपांवर पुरेसे इंधन उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.''

संपूर्ण 'लॉक डाऊन'ला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. अशा वाहनांची ओळख पटविणारे परवाने उपलब्ध करून वाहतूक सुरळीत केली जात असल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख