निवृत्त ACP भानुप्रताप बर्गे यांची राजकारण प्रवेशासाठी चाचपणी

निवृत्त ACP भानुप्रताप बर्गे यांची राजकारण प्रवेशासाठी चाचपणी

पुणे : निवृत्त सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना बर्गे यांनीच "फेसबुक'च्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करावा की नको याबाबत प्रतिक्रिया मागविल्या आहेत. बहुसंख्य लोकांनी त्यांना राजकारण प्रवेशाचा सल्ला दिला आहे. काहीजणांनी मात्र राजकारण आपले काम नाही, असेही स्पष्टपणे सांगितले आहे. 

बर्गे गेल्या महिन्यात निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त त्यांचे अभार व्यक्त करणारे तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देणारे "होर्डींग्ज' शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आली होती. त्यात राजकीय मंडळींचा भरणा अधिक होता. तेव्हाच ते राजकारणात जाणार असल्याचे बोलले जात होते. 

काहींनी त्यांचा मतदारसंघदेखील नक्की करून टाकला होता. ते भारतीय जनता पक्षाकडून शिवाजीनगर मतदारसंघातून लढणार असे सांगण्यात येत.  या साऱ्या पार्श्‍वभूमीवर बर्गे यांनी थेट "फेसबुक'च्या माध्यमातून लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी त्यांना त्यासाठी शुभेच्छा दिल्या असल्या तरी काहींनी सावधानतेचा इशाराही दिला आहे.

बर्गे यांची अनेक राजकीय नेत्यांशी ऊठबस आहे. पुण्यातच बराच काळ नोकरी केल्याने त्यांचा संपर्कही दांडगा आहे.  निवृत्त व्हायच्या आधीच त्यांनी प्रमुख राजकीय नेत्यांच्या कानावर आपली राजकारणात प्रवेशाची इच्छा कानी घातली आहे. मात्र अद्याप त्यांना ठोस आश्वासन मिळाले नसल्यानेही त्यांनी अधिकृत पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात येते.  

या संदर्भात बर्गे यांच्याशी संपर्क साधला असता, लोकांच्या प्रतिक्रिया आजमावून घेत आहे. येत्या काही दिवसांत आणखी नेमका अंदाज येईल. संधी कुठून मिळू शकते याचाही शोध घेतोय, असे त्यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com