जे तलाठीही झाले नाहीत, ते निघाले आयुक्तांची मापे काढायला!

सदाशिवराव पोळ यांच्यासारख्या दिवंगत नेत्यांबद्दल सुद्धा एकेरी भाषेत बोलत आहेत.
जे तलाठीही झाले नाहीत, ते निघाले आयुक्तांची मापे काढायला!

पुणे : "आयुक्तांवर बोलायला अगोदर तलाठी व्हावं लागतं. तलाठीही झाले नाहीत आणि निघाले आयुक्तांची मापे काढायला," असा टोला माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी माजी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला. 

दहिवडी येथे "आमचं ठरलय" सर्वपक्षीय आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्यात देशमुख यांनी माजी आमदार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली.

दहिवडी येथे "आमचं ठरलंय" या सर्वपक्षीय आघाडीच्यावतीने झालेल्या सभेत देशमुख बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रभाकर देसाई, रणजितसिंह देशमुख, भाजपचे नेते अनिल देसाई, डॉ संदीप पोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार, सचिन गुदगे, संदीप मांडवे, दिलीप तुपे आदि मान्यवर उपस्थित होते.

देशमुख म्हणाले,"तालुक्याचे माजी आमदार खूपच बेताल विधाने करत सुटले आहेत. ते एकेरी भाषेत माझ्यावर आणि दिवंगत सदाशिवतात्या पोळ यांच्यावर टीका करत आहेत. माणदेशी माणसाची संस्कृती ही एकमेकांचा आदर करणारी आहे. पण हे महाशय इथला इतिहास आणि इथली संस्कृती पुसून टाकत आहेत. त्यांना स्वतःचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याची जाणीव झाल्याने त्यांचा तोल ढळला आहे. त्यामुळे ते सदाशिवराव पोळ यांच्यासारख्या दिवंगत नेत्यांबद्दल सुद्धा एकेरी भाषेत बोलत आहेत. ज्या नेत्याने तालुक्याचे पन्नास वर्षे नेतृत्व केले त्या माणसांबद्दल त्यांच्या पश्चात टीका करणारा आणि त्यांचा द्वेष करणारा हा माणूस विकृत आहे.त्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे."

"मी मातीशी इमान राखणारा माणूस आहे. माझ्या तालुक्यात वाईट काही घडत असेल तर त्याला माझा विरोध असेल. गेल्या दहा वर्षांत तालुक्यातील तरुणांना स्वतःच्या  राजकारणासाठी बरबाद करणाऱ्या प्रवृत्ती आता तालुक्याच्या बाहेर घालवूया. माणदेशी संस्कृती जपूया,"असे आवाहन देशमुख यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com