#कारणराजकारण - सोलापूरच्या राजकीय पटलावरून  सुशीलकुमारांचे 'पॅकअप्‌'?

केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय भावनिक आवाहन करत लढवली. 'यंदा माझी शेवटची निवडणूक आहे. मला मते द्या...' असे आवाहन त्यांनी प्रचारसभांमधून केले. परंतु आज (गुरूवारी) लोकसभा निवडणूकीचे मतदान निकाल हाती आल्यावर शिंदे मोठ्या फरकाने पराभूत होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोलापूरच्या राजकीय आखाड्यातून शिंदे यांना 'पॅकअप्‌" करावे लागण्याची चिन्हे आहेत.
#कारणराजकारण - सोलापूरच्या राजकीय पटलावरून  सुशीलकुमारांचे 'पॅकअप्‌'?

सोलापूर : केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय भावनिक आवाहन करत लढवली. 'यंदा माझी शेवटची निवडणूक आहे. मला मते द्या...' असे आवाहन त्यांनी प्रचारसभांमधून केले. परंतु आज (गुरूवारी) लोकसभा निवडणूकीचे मतदान निकाल हाती आल्यावर  शिंदे मोठ्या फरकाने पराभूत होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोलापूरच्या राजकीय आखाड्यातून शिंदे यांना 'पॅकअप्‌" करावे लागण्याची चिन्हे आहेत. 

दुसऱ्या बाजूला सोलापूरच्या राजकीय आखाड्यात प्रथमच डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजींच्या रूपाने एका आध्यात्मिक राजकीय नेत्याचा उदय झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे तगडे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा येथे अजिबात प्रभाव जाणवला नाही.  सोलापूरच्या रामवाडी गोदामात सुरू असलेल्या मतमोजणी केंद्रातून दुपारी सव्वा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांना तीन लाख 19 हजार 846 मते घेत 99 हजार 612 मतांनी आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसच्या शिंदे यांना दोन लाख 20 हजार 234 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना 96 हजार नऊ मते मिळाली आहेत. 

महाराजांसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आखलेली राजकीय रणनिती अगदी यशस्वी झाल्याचे या निकालावरून दिसून येत आहे. दोन्ही मंत्र्यांतील गेल्या पाच वर्षातील विसंवादाचा या निवडणुकीवर काडीमात्रही परिणाम झाला नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. महाराजांची प्रतिमा, मोदींचा करिश्‍मा, दोन्ही मंत्र्यांनी केलेली मेहनत, मित्रपक्ष शिवसेनेची मनःपूर्वक साथ यामुळे महाराजांची विजयी वाटचाल सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. 
अक्कलकोटच्या गौडगावातील मठाधिपती असलेल्या डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचा सोलापुरातील शेळगीत मठ असून तेथे आज मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येकजण महाराजांचे अभिनंदन करत असून उपस्थित सर्वजण एकमेकांना मिठाई भरवत असल्याचे चित्र आहे. गौडगावच्या मठामध्येही हेच चित्र असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक बाबी... 

- शिंदे यांचे भावनिक आवाहन मतदारांनी ठोकरले

- 'वंचित' फॅक्‍टरचा सोलापुरात फारसा परिणाम नाही

- पुन्हा एकदा मोदी लाट असल्याचे सिद्ध
-दोन्ही मंत्रीव्दय देशमुखांनी भाजपासाठी योग्य रणनिती आखल्याचे स्पष्ट

- आरंभी नाराज असलेल्या शिवसेनेने प्रामाणिकपणे भाजपला साथ दिल्याचे सिद्ध

- सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रथमच सलग दुसऱ्यांदा भाजपाचा दणदणीत विजय

- गौडगाव (ता. अक्कलकोट), शेळगी (सोलापूर) येथील मठामध्ये मोठी गर्दी
- भाजप नेत्यांनी सुरू केली विजयोत्सवाची तयारी

- माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपाच्या नेत्यांची चढाओढ

- मंत्र्यांतील विसंवादाचा परिणाम नाही 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com