#कारणराजकारण- जळगावातून भाजपचे उन्मेश पाटील चार लाख 8 हजार विक्रमी मतांनी विजयी 

जळगाव लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उन्मेश पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर याच्यावर तब्बल चार लाख 8 हजार विक्रमी मतांनी विजय मिळविला आहे. मतदार संघातील आजपर्यत सर्वात मोठे मताधिक्‍य आहे.त्यांनी भाजपचे खासदार ए.टी.पाटील यांचा गेल्या वेळेचा 3लाख 86 हजाराच विक्रम मोडला आहे.
#कारणराजकारण- जळगावातून भाजपचे उन्मेश पाटील चार लाख 8 हजार विक्रमी मतांनी विजयी 

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उन्मेश पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर याच्यावर तब्बल चार लाख 8 हजार विक्रमी मतांनी विजय मिळविला आहे. मतदार संघातील आजपर्यत सर्वात मोठे मताधिक्‍य आहे.त्यांनी भाजपचे खासदार ए.टी.पाटील यांचा गेल्या वेळेचा 3लाख 86 हजाराच विक्रम मोडला आहे. 

जळगाव लोकसभा मतदार संघात मोदी फॅक्‍टर जोरदारपणे चालला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांचा तब्बल चार लाख 8 हजार मतांनी विजय झाला आहे. राज्यातील हे सर्वाधिक मताधिक्‍य असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. उन्मेश पाटील यांना 7लाख 7 हजार 220 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यांना 4लाख आठ हजार मते मिळाली. 

ए.टी.पाटील यांचा विक्रम मोडला
जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार ए.टी.पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ.सतीष पाटील यांच्यावर 3लाख 86 हजार मताधिक्‍याने विजय मिळविला होता. त्यांचा हा विक्रम भाजपचे उन्मेश पाटील यांनी मोडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com