#कारणराजकारण- दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना अकरा हजार मतांमी आघाडी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना अकरा हजांराची आघाडी मिळाली आहे. अन्न महामंडळाच्या अंबड येथील गुदामात मतमोजणीला सकाळी आठला प्रारंभ झाला.
#कारणराजकारण- दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना अकरा हजार मतांमी आघाडी

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना अकरा हजांराची आघाडी मिळाली आहे. अन्न महामंडळाच्या अंबड येथील गुदामात मतमोजणीला सकाळी आठला प्रारंभ झाला. 

प्रारंभी सर्व्हीस व पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. तीचा वेग अत्यंत संथ होता. 1500 सर्व्हीस आणि 2398 पोस्टल अशा 4,948 मतांची मोजणी झाली. त्यानंतर पहिल्या फेरीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यात डॉ. भारती पवार यांना सुमारे चार हजार मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले सर्व्हीस व पोस्टल मतांत आघाडीवर होते. मात्र, त्यानंतर ते मागे पडले. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मार्क्‍सवादी कम्युनीस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावीत तिसऱ्या क्रमांकावर होते. मतमोजणीत येवला, चांदवड, नांदगाव, निफाड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार तर कळवण आणि दिंडोरीत राष्ट्रवादीचे धनराज महाले आघाडीवर असल्याचा कल दिसुन आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com