#कारणराजकारण - पंजाबमध्ये कॉंग्रेसने पटकावल्या 13 पैकी 8 जागा

पंजाबमध्ये कॉंग्रेसने लोकसभेच्या 13 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. गेल्या लोकसभेला कॉंग्रेसचे फक्त तीन खासदार होते. कॉंग्रेसपक्षाने 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 117 पैकी 77 जागा जिंकल्या होत्या. अकाली दलाचे गेल्यावेळी 2014 मध्ये चार खासदार निवडून आले होते. यावेळी त्यांना फक्त दोन खासदारांवर समाधान मानावे लागणार आहे.
#कारणराजकारण - पंजाबमध्ये कॉंग्रेसने पटकावल्या 13 पैकी 8 जागा

नवी दिल्ली :  पंजाबमध्ये कॉंग्रेसने लोकसभेच्या 13 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. गेल्या लोकसभेला कॉंग्रेसचे फक्त तीन खासदार होते. कॉंग्रेसपक्षाने 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 117 पैकी 77 जागा जिंकल्या होत्या. अकाली दलाचे गेल्यावेळी 2014 मध्ये चार खासदार निवडून आले होते. यावेळी त्यांना फक्त दोन खासदारांवर समाधान मानावे लागणार आहे.

भाजपचे गेल्यावेळी दोन खासदार होते. यावेळीही त्यांचे दोन खासदार निवडून आले आहेत. गुरुदासपूरची कै. विनोद खन्ना यांची जागा सन्नी देओलने राखली तर होशियारपूरमधून राजकुमार छब्बेवाल विजयी झाले आहेत. आम आदमी पार्टीने 2014 मध्ये पंजाबमध्ये चार जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांचा फक्त एक खासदार निवडून आला आहे.

- गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सनी देओल यांनी कॉंग्रेसचे सुनिल जाखर यांचा 82 हजार 459 मतांनी पराभव केला आहे.

- संगरूर मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी कॉंग्रेसच्या केवलसिंग धिल्लॉं यांचा 1 लाख 10 हजार 211 मतांनी पराभव केला आहे.

- भटिंडा मतदारसंघातून अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी कॉंग्रेसचे अमरिंदरसिंग राज यांचा 21 हजार 772 मतांनी पराभव केला आहे.

- आनंदपूर साहिब मतदारसंघातून कॉंग्रेसचे मनिष तिवारी यांनी अकाली दलाचे प्रेमसिंग यांचा 46 हजार 884 मतांनी पराभव केला आहे.

- फिरोजपूरमधून अकाली दलाचे सुखबिरसिंग बादल यांनी कॉंग्रेसचे शेरसिंग यांचा 1 लाख 98 हजार 850 मतांनी पराभव केला आहे.

- कॉंग्रेसने अमृतसर, लुधियाना, पतियाळा, आनंदपूर साहिब, फरिदाकोट, फत्तेगडसाहि, जालंधर, खादूरसाहिब या आठ जागा जिंकल्या आहेत.

- अकाली दलाने भटींडा व फिरोजपूर या जागा जिंकल्या. भाजपने गुरदासपूर, होशियारपूर या दोन जागा जिंकल्या. आम आदमी पार्टीने संगरूर ही एकमेव जागा जिंकली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com