#ResultsWithSarkarnama - Chagan Bhujbal Reaction | Sarkarnama

#कारणराजकारण - हा मोदींचा नव्हे; 'इव्हीएम'चा विजय : छगन भुजबळ 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 23 मे 2019

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीत सध्याचा ट्रेंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजुन मोठ्या बहुमताकडे वाटचाल करतो आहे. यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता "हा भाजपचा नव्हे तर 'इव्हीएम'चा विजय आहे," अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली आहे. 

नाशिक : लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीत सध्याचा ट्रेंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजुन मोठ्या बहुमताकडे वाटचाल करतो आहे. यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता "हा भाजपचा नव्हे तर 'इव्हीएम'चा विजय आहे," अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली आहे. 

ते म्हणाले, ''अनेक नेते, राजकीय पक्ष आणि तज्ञांनी मतदान यंत्रांविषयी अनेक शंका व्यक्त केली होती. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रारी होत्या. सगळ्यांनी व्हीव्हीपॅटची मोजणी करावी. अशा अनेक शंका आहेत. मतपत्रिकेवर मतदान घ्यावे ही देखील मागणी होती. मात्र त्याला अपेक्षीत प्रतिसाद संबंधीत यंत्रणांकडून मिळालेला नाही. शेतकरी आणि समाजातील मोठ्या वर्गात नाराजी असतांना हा निकाल लागलेला आहे. तो धक्कादायक आहे. मला तो आश्‍चर्यकारक वाटतो. 

मतमोजणीचा कल बाहरे आल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट होता. मात्र, अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भुजबळ फार्म येथे जमले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख