#कारणराजकारण - बुलडाणा- शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची विजयाची हॅटट्रीक; घाटाखालील लिड ठरले महत्वाचे

बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी १ लाख ३७ हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे.
 Prataprao Jadhav - Rajendra Shingne
Prataprao Jadhav - Rajendra Shingne

खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या  फेरी अखेर त्यांनी १ लाख ३७ हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या  विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणुकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील लिड महत्वाचा ठरत असल्याच्या वृत्तावर शिक्का मोर्तब झाले आहे.

गेल्या काही वर्षापासून  लोकसभा निवडणुकींमध्ये घाटाखाली लिड आणि विजय असे समीकरणच बनले आहे. घाटाखाली  तीन विधानसभा मतदार संघ असून  त्यापैकी  मलकापूर हा मतदार संघ रावेर लोकसभा मतदार संघामध्ये येतो तर खामगाव व जळगाव जामोद हे  बुलडाणा लोकसभा मतदार संघात येत असून दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत.  मागील लोकसभा निवडणुकीत खामगाव व जळगाव जामोद मतदारसंघातून लिड मिळाला होता. त्यामुळे यावेळी या मतदार संघातून प्रतापराव जाधव यांना किती लिड मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते.  

परंतु, यावर्षी सुध्दा दोन्ही मतदार संघातून जाधव यांना ७० हजारांच्या वर लिड मिळाले असल्याने  प्रतापराव जाधव यांच्या विजयात घाटाखालील लिड किती महत्वाचे ठरले हे स्पष्ट झाले आहे. शेवटच्या फायनल आकडेवारीत हे लीड वाढू शकते. बुलडाणा लोकसभा मतदार संघात भाजप शिवसेना व मित्र पक्ष युतीचे खासदार प्रतापराव जाधव, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे डॉ.राजेंद्र शिंगणे  वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांच्यात लढत झाली. खा.प्रतापराव जाधव यांना ही निवडणूक अवघड जाईल असे चित्र होते. मात्र मोदी करिष्मा प्रतापराव जाधव यांच्यासाठी फायद्याचा ठरला आहे , तसेच भाजपा आमदार व कार्यकर्त्यांनी दिलेली समर्थ साथ खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी जमेची बाजू ठरली. 

खासदार प्रतापराव जाधव यांची ही विजयाची हॅटट्रीक आहे. पहिल्या फेरी पासून  शेवटच्या फेरी संपेपर्यंत खासदार प्रतापराव जाधव यांची आघाडी कायम राहिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र शिंगणे दुसऱ्या  क्रमांकावर राहिले. तर वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार फारसी जादू दाखवू शकले नाहीत. खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयामुळे भाजप शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

विजयात खामगावचा मोठा वाटा
खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयात खामगाव मतदार संघाचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांना खामगाव विधानसभा मतदार संघात ३२ पेक्षा जास्त मतांचा लीड मिळाला आहे. यापूर्वी सुद्धा मागील १ टर्म खामगावने भक्कमपणे साथ दिल्याने खासदार जाधव यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती. खामगाव आणि जळगाव मतदार संघाने नेहमीच खासदार जाधव तारले आहे

भारतीय जनता पार्टीला मिळालेले हे अभूतपूर्व यश  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या जनहिताच्या कामामुळे, देशभरात केलेल्या विकास कामांची जनतेने दिलेली पावती आहे. विरोधी पक्षाच्या अपप्रचाराला जनता बळी पडली नाही.  खामगाव मतदार संघात लीड देण्यासाठी आम्ही काम केले. कार्यकर्त्यांची मेहनत आणि आमचे मार्गदर्शक दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांची पुण्याई असल्याने  खासदार प्रतापराव जाधव यांना खामगाव मतदारसंघातील मतदार बांधवांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत. तसेच या विजयाद्वारे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून प्रचंड विजय मिळवून विरोधकांना झणझणीत चपराक लगावली आहे.  माझ्या मतदार संघातील कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार. 
- अ‍ॅड. आकाश फुंडकर
आमदार , खामगाव विधानसभा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com