राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांची आरक्षणे जाहीर 

णे, नाशिक, नगर यांच्यासह राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. पुणे व नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी तर नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी ठेवण्यात आले आहे.
ZP Presidents posts Reservation Declared in mantralaya
ZP Presidents posts Reservation Declared in mantralaya

मुंबई : पुणे, नाशिक, नगर यांच्यासह राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. पुणे व नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी तर नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी ठेवण्यात आले आहे. 

जिल्हा परिषद म्हणजे त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था आहे. महाराष्ट्रात सध्यस्थितीत मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद अस्तित्वात आहे. यापैकी नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप व्हायची आहे. 

आज मंत्रालयात आरक्षणांची सोडत काढण्यात आली. त्यानुसार आरक्षणे पुढील प्रमाणे -

अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना

अनुसूचित जाती (महिला) : नागपूर,  उस्मानाबाद

अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली

अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड

नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड

खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा

खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com