Reservation in Medical Education will Be from Current Year | Sarkarnama

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदापासूनच आरक्षण लागू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 जुलै 2019

यंदाच्या वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार आहे. यंदाच्या वर्षीपासून आरक्षण लागू करु नये यासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.  

मुंबई :  यंदाच्या वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार आहे. यंदाच्या वर्षीपासून आरक्षण लागू करु नये यासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.  

मराठा समाजाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू होणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी एसईबीसीअंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. प्रवेश प्रक्रिया जरी आधी सुरु झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते, त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा वैध नसल्याचा राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने स्वीकारला आहे.

दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मराठा आरक्षण लागू करू नये. २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासूनच मराठा आरक्षण लागू करावे, यासाठी राज्य सरकारने एसईबीसी कायद्यात केलेली सुधारणा अवैध ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका 'एमबीबीएस'ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख