reservation fpr maratha samaj | Sarkarnama

आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी पात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगापूर तालुक्‍यातील कायगाव टोका येथील पुलावरून गोदापात्रात उडी घेतलेल्या काकासाहेब शिंदे (वय 28) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कायगाव टोका येथे दुपारी सव्वातीन वाजता आंदोलन सुरू होते. त्यावेळी काकासाहेब याने नदीत उडी मारली. तातडीने त्याला गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. 

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी कायगाव टोका येथील गोदापात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी सकाळी दिला होता. कायगाव येथे मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले होते. गोदावरी नदीच्या नव्या पुलावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना रोखण्याचा पोलिस प्रयत्न करत होते. यावेळी काकासाहेब दत्तात्रय शिंदे याने गोदावरी पात्रात उडी घेतली. हा प्रकार घडताच आंदोलक आणि पोलिसांनी जुन्या पुलाकडे धाव घेऊन काकासाहेब शिंदे याला बाहेर काढून त्याला गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासून काकासाहेब यास मृत घोषित केले. 

lघाटी रुग्णालयात मोठ्या संख्येने लोक दाखल झाल्याने तणावाचे वातावरण आहे. सीआरपी प्लाटूनसह मोठा पोलिस बंदोबस्त रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आला आहे. काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूला मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मुख्यमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत काकासाहेब शिंदेचा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना 22 जुलै रोजी जलसमाधीचा इशारा देणारे निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही. त्यामुळेच शिंदे याचा बळी गेल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख