उत्तरादाखल चाकणकरांना लावणी महोत्सव आणि भेळ पार्टीचं निमंत्रण!

सहकारी साखर संघ व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. तेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पाहिले अध्यक्ष होते.
 In reply, Chakankar invites Lavani Festival!
In reply, Chakankar invites Lavani Festival!

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केलेली टीका त्यांच्या समर्थकांना जिव्हारी लागली आहे. प्रत्युत्तरादाखल 'विजयदादा राष्ट्रवादीला नकोसे तर पक्षाने त्यांच्यावर आजतागायत का कारवाई केली नाही ?' असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

दोन दिवसांपुर्वी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या कार्यक्रमात शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर यासंबंधाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर 'आपण इतर पक्षात गेलेलो नाही, इथेच आहोत' असे उत्तर मोहिते पाटील यांनी दिले होते. त्यावर 'जिकडे भेळ तिकडे मोहिते पाटलांचा खेळ' अशी टीका रूपाली चाकणकर यांनी केली होती. त्यावर मोहिते पाटील यांच्याकडून कुणी प्रतिक्रिया नोंदवली नाही, मात्र आज 'विजयसिंह मोहिते पाटील समर्थक' पेजवरून उत्तर देण्यात आले आहे. 

ती फेसबुक पोस्ट :
विजयदादा राष्ट्रवादीला नकोसे तर पक्षाने त्यांच्यावर आजतागायत का कारवाई केली नाही ?
या प्रश्नाच्या उत्तरात खूप काही दडलंय..!!
स्वतः पवार साहेबांनी व जयंत पाटील साहेबांनी २ महिन्याखाली झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील जन्मशताब्दी कार्यक्रमात विजयदादांना पक्षात सक्रिय होण्याचा आग्रह केला ; मात्र दादांनी विनम्रपणे सक्रिय होण्यास नकार दिला. पण त्याचसोबत हा ही शब्द दिला की, "मी ज्या पक्षाच्या स्थापनेत व उभारणीत हातभार लावला त्या पक्षातचं राहीन."
त्यामुळं कार्यकर्त्यांनी नेत्यांकडून सविस्तर माहिती करून घ्यावी; मग त्यानंतर आभाळ .....!!

महितीस्तव..
सहकारी साखर संघ व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. तेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पाहिले अध्यक्ष होते. आज ज्या जागेवर इन्स्टिट्यूट आहे ती मांजरीची जमीन त्यांनीच पाठपुरावा करून शासनाकडून घेतली आहे. आणि विजयदादा त्या संस्थेच्या गवर्निंग कौन्सिलचे म्हणजेच संचालक मंडळाचे आजन्म संचालक आहेत.
रुपालीताई, आपणास सन्मानपूर्वकआग्रहाचं निमंत्रण..
अकलूजच्या लावणी महोत्सवाचा कार्यक्रम बघण्यासाठी व प्रसिद्ध भेळ खाण्यासाठी..!!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com