धर्मगुरुंनी घरीच पुजा- अर्चा, नमाज पठणाची सूचना करावी' : छगन भुजबळ 

"कोरोना'च्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणू संसर्ग व साथरोग नियंत्रण उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहातप्रमुख अधिकारी व विभागप्रमुखांची त्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.
chagan-bhujbal
chagan-bhujbal

नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी धर्मगुरुंनी आपल्या भाविकांना घरीच पूजा- अर्चा तसेच नमाज पठण करण्याची सूचना करावी. अशा सूचना दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

"कोरोना'च्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणू संसर्ग व साथरोग नियंत्रण उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहात प्रमुख अधिकारी व विभागप्रमुखांची त्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयीची माहिती दिली. 

ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व यंत्रणांचे काम प्रशंसनीय आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची टोल नाका व बस स्टॅण्डवर स्क्रींनिगची व्यवस्था आहे. विवाह सोहळा थोडक्‍यात आटोपण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. धर्मगुरुंनी आपल्या भाविकांना घरीच पुजा अर्चा तसेच नमाज पठण करण्याची सूचना करावी.

मास्क व हॅण्ड सॅनिटायझरचा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचा काळाबाजार व साठेबाजार केल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल. रेशन दुकानांवर 31 मार्च 2020 पर्यंत दोन महिन्यांचे रेशन देण्याची व्यवस्था केली आहे. 

नाशिक येथे व्हॅटिंलेटर व मॉनिटर खरेदीसाठी निधी उपलब्ध आहे. कोरंटाईन शिक्का असणाऱ्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असून अडचणी असल्यास नागरिकांनी 104 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. रेल्वे प्रवासी कमी करण्यासाठी प्रयत्न आहेत. बसमध्ये विरुध्द दिशेला प्रवासी बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यासाठी शासनाकडून 1 कोटीचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. 

यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील, पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, उपायुक्त रघुनाथ गावडे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com