`वंचित'च्या महिला कार्यकारणी अध्यक्षपदी रेखा ठाकूर

वंचित बहूजन आघाडीने आता राज्य महिला कार्यकारणी जाहीर केली असून त्यामध्ये ईशान्य मुंबई (मुलूंड), अकोला, अमरावती, बुलढाणा (सिंदखेड राजा), वाशिम, परभणी, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, पुणे, जळगाव व सांगली जिल्ह्यातील महिलांना संधी मिळाली आहे. रेखा ठाकूर यांची वंचित बहूजन आघाडीच्या राज्य महिला कार्यकारणीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
rekha thakur elected as vba women wing state president
rekha thakur elected as vba women wing state president

सोलापूर : वंचित बहूजन आघाडीने आता राज्य महिला कार्यकारणी जाहीर केली असून त्यामध्ये ईशान्य मुंबई (मुलूंड), अकोला, अमरावती, बुलढाणा (सिंदखेड राजा), वाशिम, परभणी, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, पुणे, जळगाव व सांगली जिल्ह्यातील महिलांना संधी मिळाली आहे. रेखा ठाकूर यांची वंचित बहूजन आघाडीच्या राज्य महिला कार्यकारणीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेलेली वंचित बहूजन आघाडी विविध प्रश्‍नांवर आंदोलन करुन उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरुध्द ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत मोर्चा काढला. आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर मोर्चा काढला जाणार आहे. 

या पार्श्‍वभूमीवर वंचित बहूजन आघाडीने महिलांची राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलनाला निश्‍चितपणे महिलांचे पाठबळ वाढेल, असा विश्‍वास पक्षाला वाटतोय. कार्यकारणीतील महिला पदाधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. 

राज्य कार्यकारणीतील पदाधिकारी 
रेखा ठाकूर : अध्यक्ष 
अरुंधती शिरसाट : सरचिटणीस (ईशान्य मुंबई) 
डॉ. निशा झेंडे : उपाध्यक्ष (अकोला) 
सविता मुंढे : उपाध्यक्ष (अमरावती) 
डॉ. गजाला खान : उपाध्यक्ष (बुलढाणा) 
डॉ. विजया चव्हाण : सचिव (परभणी) 
किरण गिऱ्हे : सदस्य (वाशिम) 
रोहिणी टेकाळे : सदस्य (पुणे) 
अंजना गायकवाड : सदस्य (सोलापूर) 
डॉ. अभिलाषा गावातुरे : सदस्य (चंद्रपूर) 
निर्मला बनशिव : सदस्य (पुणे शहर) 
शमिभा पाटील : सदस्य (जळगाव) 
डॉ. क्रांती सावंत : सदस्य (सांगली)  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com